STORYMIRROR

Anil Chandak

Tragedy

4  

Anil Chandak

Tragedy

भयावह हैदोस

भयावह हैदोस

1 min
285


मनोरूग्ण निराश्रित, रस्त्यावर फिरणारी,

स्रीयांसी गुंड जबरदस्ती,अनाचार करी !!1


अल्पवयीन, मुलीवर,बलात्कार करतो,

कुणी लिंगपिसाट,वासनेला बळी पाडतो !!2



स्त्रीभृणाला,गर्भपाते नष्ट करूनी फेकती,

दुष्ट मायबाप,काही उकीरडा ही गाठती !!3



किळस अश्या लोकांची, ओल नाही भावनेची !

नाही लवलेश माणुसकी,भूक वासनांची !!4



गरिब घरच्या,मुली,देवदासी बनविती,

देहविक्रय करण्यां, बाजारात बसविती !!5



पैसा कमविण्यां करी,हेराँईनचा व्यापार,

नादी लावती युवकांना,देशांसी ती गद्दार !!6



वृद्ध आईबापांना सुध्दा,वृद्धाश्रमी टाकती,

लाज नाही, कशी स्वत:ला प्रतिष्ठ म्हणवती !!7



वृद्ध जनांना लुबाडी,हवस ती संपत्तीची,

आहे कुठे, ईश्वर, याचना करतो,दयेची!!8



हुंड्यापायी हत्या, तर येथे आम बात आहे ,

समाजाला कुठे घेऊन , लोभ जाणार आहे !!9



कुठे चालला समाज,कुठे आहे नीतीमत्ता,

इथे भरतो बाजार,गुंडांचीच जेथे सत्ता !!10



आध्यात्मिक, बापु गुरू,भोंदु, महामूर झाले ,

स्रीभक्तांना,आपल्या वासनेला बळी पाडले !!11



भयावह हैदोस, वासनेच्या, नंग्या नाचाची,

मनुष्यांचे,पशुत्व अजुन, अबाधित याची !!12


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy