STORYMIRROR

🤩ऋचा lyrics

Abstract Tragedy

3  

🤩ऋचा lyrics

Abstract Tragedy

भ्रष्टाचार-एक कीड

भ्रष्टाचार-एक कीड

1 min
424

भ्रष्टाचार हा एक राक्षस आहे

त्याला आपण मारलंच पाहिजे

एकत्र येऊन सार्यांनी

सर्वनाश त्याच केलाच पाहिजे...


पैसा, पैसा, आणि फक्त पैसा

हाच झालाय हल्ली मूलमंत्र

भ्रष्टाचारच झालाय आज

पैसे मिळवण्यासाठी कानमंत्र


टेबलावर वरून टेबला खालून, हीच

काम करून घेण्याची पद्धत बनलीय

सत्याची कास सोडून असत्याची साथ

का बरं आता साऱ्यांनीच धरलीय ??


भ्रष्टाचार नका करू

असं कित्येकांनी सांगितलंय

कठोर अनुशासन असूनही

लोकांनी त्यांना जुमानलयं?


स्वार्थी मानवजातीने आज

हद्दच पार केलीय

आज जिथे तिथे भ्रष्टाचार

हीच अवस्था मी पाहतेय!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract