STORYMIRROR

vaishali vartak

Romance Inspirational

3  

vaishali vartak

Romance Inspirational

भ्रमर (गीत)

भ्रमर (गीत)

1 min
180

 वेडा हा मिलींद । गुंजनात गुंग । 

 भ्रमणात राही सदाची दंग ।


दिसता कमल । विसरतो भान। 

 सदाचिया असे सेवनात ध्यान ।

मिळतसे जीवा मनात आनंद

वेडा हा मिलींद । गुंजनात गुंग ।     1


झाली सांज वेळ । कमला समीप। 

जरी चोहीकडे  लागले ते दीप ।

मिटताच दल । होई बंदी भृंग। 

वेडा हा मिलींद । गुंजनात गुंग ।    2


खर पहाताच l नसे ते अशक्य. I 

छेदणे तयास सहजची शक्य l

पंकजाच्या तोही प्रेमे राही दंग 

वेडा हा मिलींद । गुंजनात गुंग ।     3


छेद कमळास । परि न करितो l 

 पंकजास तोही प्रेमेची स्मरतो 

जगतासी ज्ञान ! नकोच आसक्ती 

 मोहाची विरक्ती! वदे वैशू         4



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance