भलरी गीत
भलरी गीत
भलं रं दादा भलंगडी दादा
भलं..रं..भल..
चला बिगी बिगी शेतामधी
धान्य कापणी करू जोशामधी
भलं..रं..भल..
कोयता घेऊ हातात कापणीला
सपासपा कापायचे त्या कणसाला
कापू भरभर
भलं..रं..भल...
चल गं बाये कणसं भरायला
गोण्या घेऊन जायचं बाजाराला
भलं..रं भलं..
जुंपू गाडीला बैल जोडी
बैलगाडी धावेल बाजार मोडी
भलं..रं भलं...
धान्य भावात विकायचं
चोख पैशात तोलायचं
भलं..रं भलं...
गोडाच जेवण बनवायच
पंक्तिला सर्वांना घेऊन बसायच
भलं..रं भलं...
