भेटीची आतुरता
भेटीची आतुरता
असा कसा रे तू मजशी विसरला,
नेत्र सुखासाठी तरी भेटशील ना मजला.
आजवरी वाट पाहुनी नयने ही दुखावली,
तरीही तुजला मी कशी नाही आठवली.
चुकले असेल मजकडून काही,
नेत्र सुखासाठी तरी भेटणार की नाही.
होती आशा तुझ्या करवी प्रेमाची,
पर तूही घेतली परीक्षा या देहाची.
सोडशील ना माझ्यावरील राग,
तू मला आज तरी हे नक्की सांग.
कशी कोठे बसू वाट पहात मी तुझी,
नेत्र सुखासाठी तरी भेट घेशील ना माझी.

