भावगीत
भावगीत
*हे भाव अंतरीचे सजणा तुला कळावे*
*प्रेमात फुलावे सजनीस ना विसरावे*॥धृ॥
*प्रेमाचे गीत माझ्या ओठांवरी सख्या आले*
*जीवनी धूंद व्हावे, मोदास उधाण यावे*
*सजनाने सजणीला प्रीतीत मनी स्मरावे* ॥१॥
*आठवात सजनाच्या मिलनाची ओढ हवी*
*ह्रदयांतरी मिलनाची आतुरता ही हवी*
*मनी मिलनाचे श्वास एकांती उमटावे* ॥२॥
*शब्द कुपीतले ओठांवरी तुझ्या फुलावे*
*गुज अंतराचे हे शब्दरूपात नहावे*
*पाव्यातील शब्द सूर आसमंती गुंजावे*॥३॥
*मिलनाच्या काव्यलहरी किणकिणल्या*
*एकांतवासात दोघात उफाळून फुलल्या*
*प्रीतलहरींनो पावसाप्रती बरसावे*॥४॥