STORYMIRROR

sarika k Aiwale

Romance Inspirational

3  

sarika k Aiwale

Romance Inspirational

भाव विभोर

भाव विभोर

1 min
276

क्षणाचे होतात भास का रे

क्षणिक आनंद विलासतो

बंद पापण्या उघडताच रे

क्षण भावनेत विरघळतो

मन चालता हे आभससवे

भाव हृदयांतरी दाटतो

क्षणाचे खेळ पाहता सारे

भाव अनामिक ठाव घेतो

डोळ्यात मावेनात का ही

क्षणचित्रे मनास वेड लावी

क्षितिजास नजर भिडता ही

मनशांत भावविभोर भारवी

चित्त वेधुनी घेते का रे

क्षणास भावनेशी खेळते

नभास वेड लागतसे रे

पहाट चित्र ते रंगवते

खुळा छंद जडला का रे

भाव मनीचा मज पुसतो

क्षणाचे ते भाव अमौलिक

भाव मनीचा या ठाव घेतो


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance