भाऊराया
भाऊराया
एक तरी भाऊ असावा छोटा किंव्हा मोठा अशी इच्छा होती,
पण नियतीच्या मनात आपली भेट लिहिलेलीच नव्हती.
रक्षाबंधन आणि भाऊबीजेला नेहमीच कमी भासते भावा तुझी,
गणपतीला राखी बांधून समजूत घालते मनाची.
तू असतास तर रोजच आपली भांडणे झाली असती,
पण तरीही तुझी लाडकी बहीण असती.
लहान असताना कधीच उणीव नाही जाणवली,
मात्र मोठेपणी पाठीराख्याच्या अस्तित्वाची किंमत कळाली.
लग्नात नवऱ्याचा कान पिळताना नक्कीच मिस करेन तुला,
तू असतास तर सासरी गेल्यावर आई वडिलांची काळजी कोण घेईल याची चिंता नसती मला,
आणि आई वडिलांनंतर माहेर नसणार याची खंत कायम राहील जीवाला.
