STORYMIRROR

Prema Rasam

Others

3  

Prema Rasam

Others

बाबा

बाबा

1 min
296

ज्यांच्या कुशीत सारी दुःख आणि चिंता मिटतात तो बाबा असतो.

जरी घरी नसले तरीही त्यांचा आदरत्मक धाक मात्र नेहमी जाणवतो.

मुलींच्या आयुष्यातला सगळ्यात पहिला मित्र हा बाबाच असतो.

मुलींचे सगळे हट्ट, नखरे पुरवणारा एकमेव व्यक्ती पण तोच असतो.

स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून मुलांना काहीही कमी पडू नये यासाठी नेहमी धडपडत असतो.

मुलांच्या चुका मोठ्या मनाने माफ करून त्यांना नेहमी सावरून घेत असतो.

आपण कितीही मोठे झालो तरीही त्यांच्या कुशीत नेहमी वात्सल्याचा सहवास असतो.

वरून कितीही कठोर दिसला तरीही मुलीसाठी मात्र त्याच्या मनाचा हळवा कोपरा राखीवच ठेवतो.

मुलीच्या लग्नाची आनंदाने, उत्साहाने तयारी करताना दाखवतो.

पण पोरगी सासरी जाणार या विचाराने तो मात्र मनातल्या मनात रडतच असतो.


Rate this content
Log in