STORYMIRROR

Prema Rasam

Others

3  

Prema Rasam

Others

स्वतः

स्वतः

1 min
277

स्वतःशी मैत्री करून स्वतःशीच बोलण्याची नकळत सवय झाली,

आणि कधीही न कळालेली मी मलाच अलगद उमजायला लागली.

जगासाठी जरी आपण कितीही वेगळे असतो,

तरीही स्वतःला मात्र खरेखुरे जाणून असतो.

दुसऱ्यांना हसू दाखवताना स्वतःला मात्र हसण्यामागच्या दुःखाची जाणीव असते,

कारण स्वतःपेक्षा जास्त चांगलं आपण कोणालाच ओळखलेलं नसते.

लोकांना कितीही फसवलं तरीही स्वतःला फसवणं सोपं नसतं,

कारण स्वतःच स्वतःला सगळं काही माहित असतं.


Rate this content
Log in