बालपण
बालपण
1 min
249
वाटे पुन्हा एकदा बालपणाच्या गावी फिरुन यावं,
त्या सगळ्या आठवणींत पुन्हा एकदा रमावं.
मित्रांसोबत केलेल्या खोड्या मोठेपणीही कराव्यात,
शाळेच्या त्या बाकावर बसून जुन्या आठवणी आठवाव्यात.
भातुकलीचा खेळ पुन्हा एकदा मांडावा,
आणि बिस्किटाचा केक स्वतःच बनवून खावा.
बाहुलीला नटवून खेळ खेळावा,
भोवरा फिरवून अलगद हातावर घ्यावा,
दंगा करून मोठ्यांचा ओरडाही खावा,
वाटे पुन्हा बालपणाचा आनंद घ्यावा.
