भास भयाचा
भास भयाचा
भास तुझा पदोपदी छळतो,
असतेस का नसतेस कळत नाही.
जाणवत राहते अस्तित्व तुझे सगळीकडे,
गेलीस सोडून तू माझी दुनिया सहजच ,
पण सहवास असतो माझ्या चोहीकडे.
कुठे,कधी, काय घडले अवचित,
दु:ख , वेदना पदरी आल्या ,
साथ तुझी नकळत सुटुन गेली.
सणक मस्तकात टोचत विरली.
मी ही हतबल होतो तेंव्हा,
नाही शकलो करु काही.
हाक मदतीची तू मारली जेंव्हा.
नको अशी छळू तू सखे,
दोष माझा काहीच नव्हता.
आगतिकता थोडी समजून घे ना .
सखेसोबती सतत सभोवती,
उणीव जाणवते तुझी मला.
आहे तुझाच मी आजही,उद्याही,
पण हे असे छळणे सोड ना.
