STORYMIRROR

Anjali Bhalshankar

Action Fantasy Others

2  

Anjali Bhalshankar

Action Fantasy Others

बेबंद स्वैर पाऊस

बेबंद स्वैर पाऊस

1 min
14

आलास! अगदी वेळेत!नाही जरा लवकरच आलास ठीक आहे ना ढगांचा गडगडाट ना वीजांचा कडकडाट शांतपणे अगदी पण कय रे!! ही वादळा पूर्वीची शांतता तर नाही ना बाबा !!कारण नाही विसरले, मी अजूनही कधी विसरूही शकणार नाही काही वर्षांपूर्वीच तुझं थैमान आठवतय आजुनही तुझ रूद्र रूप उन्मत्त !काळीज चिरणार!!स्वैर बेंबद खरे सांगते तेव्हा आयुष्यात पहिल्यांदा तुझा राग आला.नदी नाले दरया खोरया डोंगर ओंसडून तुडूंब झाले झाडे वेली पशुपक्षी गुरे ढोरे घरेदारे आणि माझ्या परिसरातील ओढयाभोवतीच्या झोपडयाही माणसासह??🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

तू आवडतोस! मला फक्त तुच आवडतोस!! इतका की माझ्या उन्हाने तापलेले छत उन्हाळा असह्य करायचे त्या क्षणी तु यावासा वाटायचास.मी सज्ज रहायचे तुझ्या स्वागताला चातकासारखी वाट पहायचे मागचे सारे अपराध विसरून!! परतु ते झालेच नाही! तु तुझ्या मर्जीने येतोस आकाशातल्या पाण्याने भरलेल्या ढगांची गोदामे रीकामी करायला मग अंगणातच काय माझ्या आईबापाने कष्टाने बांधलेल्या जीर्ण झालेल्या घराच्या भींतीच्या सांधीतून गळकया छतातून सार घर काबीज करतोस घरभर पसरतोस आणि तरीही तू मला आवडतोस. खर तर तूच आवडतोस.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action