STORYMIRROR

Sangita Pawar

Classics

4  

Sangita Pawar

Classics

बैलपोळा

बैलपोळा

1 min
211

धून काढूया बैलांना

झूल घालुनी सजवूया

शिंगांना लावूनी बेगड

त्यावर बाशिंग चढूया ||


वर्षभराच्या कष्टातून

होऊ ऋणातून मुक्त

पूजा करूआज त्यांची

भोळा शेतकरी भक्त ||


आनंद होई बैलपूजन

श्रावणपोळा आनंदाचा

हौसेने ,मौजेने सजवूया 

घास भरवू पुरणपोळीचा ||


वाजत -गाजत डौलात

गावातून मिरवणूक काढू

जोडी माझी काळू- बाळू

सजले कसे फोटो काढू ||


आज असे त्यांचा थाट

गळ्यात घुंगुर चाळी

आहेच रुबाब भारी

दृष्ट काढू संध्याकाळी ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics