STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Romance

2  

Meenakshi Kilawat

Romance

बावरे प्रेम

बावरे प्रेम

1 min
14K


राधाचे मन बावरे प्रेम बघून 

क्रृष्णालाही पाझर हा फूटला

प्रेमाने ह्रदयात राधेला घेवून

प्रेम हा जगी प्रसिद्धीस झाला.

भान हरवण्याची एक तऱ्हा

प्रेम म्हणजे असते आकर्षण 

बावऱ्या प्रेमात दोन जीवांचे

असते या जीवापाड समर्पण.

बाळ पडला अन् रडू लागला

आईने घेतले कडेवर उचलून

कुठे लागलय माझ्या बाळाला

या दोंघाचे प्रेम किती अप्रतिम

क्रृष्णाच्या प्रेमात मीरा 

सर्वतोपरी भान हरपली

पायात घुंगरू बांधून

भक्तीगायनात न्हावू लागली.

सख्या तुझ्यावर हे बावरे प्रेम

तुझ्या प्रेमाने बावरले हे मन

जडला जीव तुझ्यावर माझा

वाटतं मला हे जग अप्रतिम.

वीणेच्या वाद्व्यावरी मधूर

भक्तीगीते गाऊ लागली

एक राजकन्या बावरी 

गल्लोगल्ली फिरू लागली.

सोडून राजमहलातले सुख

ते न दिसले तिज स्वर्गाचे दार

होवून क्रृष्ण सख्याची दासी

वणोवनी फिरे आत्मा तरी

मित्र असावा निर्मळ मनाचा

सुख दुखात साथ देणारा 

सतत यशात पराजयात पण

कधीच साथ न सोडणारा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance