STORYMIRROR

Latika Choudhary

Inspirational Others

2  

Latika Choudhary

Inspirational Others

बापाची माया

बापाची माया

1 min
15.9K


झाकी डोळ्यातलं पाणी, पापणीची गं झालर

 दाबी हुंदका गळ्यात,पोर चालली सासर

 वाट मोकळी आसवांना,देत मायच्या कुशीत

 उभी सपन फुलवण्या,माय आसवे पुशीत

 बाप आसवं दाबतो,बाप फसवं हासतो

 लेक चालली सासरी,जड पायी तो नाचतो

 श्रावणातला ढग काळा,मनी दाटला दाटला

 गालावर ओघळता,नयनात तो आटला

 वाहे धार ती घामाची,मिसळते आसवात

 आसवाचं पाणी जाई ,ओठीच्या बासनात

 बाप पाही आकाशात,आनंदाचं ते चांदणं

 घोट अमृताचा त्याला ,सुखी पोरीचं नांदणं.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational