STORYMIRROR

jaya munde

Inspirational

3  

jaya munde

Inspirational

बाप

बाप

1 min
271

   मुलीचं अंतःकरण 

   आठवणींनी भरून येई,

   बाप,नावाशी जोडलेली नाळ

   आसवांतून वाहून जाई..


   किती खाल्ल्या खस्ता

   तिच्या सुखासाठी त्याने,

   क्षणोक्षणी दिले झोकून

   दुःखाच्या खाईत आनंदाने..


    डोळे मिटता झर्रकन

    कष्ट त्याचे स्मरतात,

    सासूरवाशीणीच्या हुंदक्यात

     अलगत विसावतात..


      सासरी जाताना ती

   भिंतीआडून डोळे पुसणारा,

   आजही आठवतो तो बाप

   हसत-हसत सारं सोसणारा..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational