STORYMIRROR

Prem Gaikwad

Abstract

3  

Prem Gaikwad

Abstract

बाप

बाप

1 min
202

बाप तो बापच। बापाची महती।

वर्णावी हो किती। मुखाने या ।।१।।


बापावीन नाही।ओळखच जगी।

बापच तो त्यागी। सर्वस्व च।।२।।


बापाला च ठावं ।किती खातो खस्ता।

मिळे काजू, पिस्ता।बापांमुळे ।।३।।


घराचं ही छत।सर्वांची सावली।

बापच माऊली।सर्वांचीच।।४।।


बाप माझा देव।बाप पांडुरंग।

गाऊ या अभंग।बापाचे च।।५।।


आपला जनक।बाप जन्मदाता।

बापच विधाता।ब्रह्म-विष्णू।।६।।


विठ्ठल रुख्मिणी।शंकर पार्वती।

राधाकृष्ण होती।बाप माझा।।७।।


बापाची आरती।अभंग पोवाडे।

भजनही गडे।बापाचेच।।८।।


बापाविन जगी।काहीच हो नाही।

बाप सर्व काही।जगामध्ये।।९।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract