STORYMIRROR

Shivani Hanegaonkar

Children

3  

Shivani Hanegaonkar

Children

बालपणीच्या मैत्री

बालपणीच्या मैत्री

1 min
246

बालपणीच्या मैत्रीला 

कशाचीच नाही तोड

ज्याला होती नेेहमी

प्रेमळ मायेची जोड


कधी लुटूपुटच्या भांडणाचे

सूर पकडायचे जोर

तरीही हाताच्या दोन्ही बोटांनी

जुळला जाई बट्टीचा दोर


मज्जा मस्तीत जगण

बस हाच होता एक नियम

खूप सार्या खोड्या केल्या

त्यासोबत चोपही मिळाला बेेेदम


मनाच्या गाभार्याला होती

फक्त निर्मळतेची झालर

जोडीला होती जगण्याला

अजाणतेपणाची सर


आयुष्याचा सुुंदर काळ

जर कोणी विचारला तर

उत्तर हेच असेल माझ

बालपणीच्या मैत्रीचा बहर


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Children