जर असते पंख मला
जर असते पंख मला
1 min
211
जर असते पंख मला
उडालो असतो आकाशात
निसर्ग साठवला असता डोळ्यात
मुक्तविहार केला असता बागेत
जर असते पंख मला
लागली नसती कोणती गाडी
कराव्या लागल्या नसत्या भानगडी
पूर्ण केल्या असत्या आवडीनिवडी
जर असते पंख मला
जीवनात केली असती मजा
मला नको कसलाच गाजावाजा
झालो असतो मी मनाचा राजा
