STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Others Children

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Others Children

चांदणी रात

चांदणी रात

1 min
284

पुनवेच्या राती चंद्र प्रकाशमान किती

टिपूर चांदणं नभी चमचम करिती


हवेतील गारवा देई थंडगार हवा

नभातला चंद्र रोज भासे नवनवा


आजी सांगे गोष्ट वय तिचे पासष्ट

थकतच नाही करू दे कितीही कष्ट


चांदण्या प्रकाशात मोकळ्या अंगणात

गाणी गोष्टी ऐकत झोप येई डोळ्यात


नाही पंख्याखाली ना कुलरच्या वाली

मस्त झोपतो मोकळ्या आभाळाखाली


टिपूर चांदण्यातील दिवस सरतात खास

आठवणीत राहतो साऱ्यांचा सहवास



Rate this content
Log in