डोंगरवरचा प्रवास
डोंगरवरचा प्रवास
1 min
216
चला गड्यांनो आपण सारे सहलीला जाऊ,
डोंगरावरचा परिसर सारा पाहून हो येऊ.
नागमोडी वळण वाट,
चढून जाऊ डोंगरघाट,
घाटावरच्या गवतावरती बसून गाणी गाऊ
चला गड्यांनो आपण सारे सहलीला जाऊ.
डोंगरघाडीत उंच कडे,
शुभ्र धबधबे पाहू गडे.
डोंगरातल्या मैदानी मग नाचू खेळू धावू,
चला गड्यांनो आपण सारे सहलीला जाऊ.
निसर्गाची मिळेल संगत,
तळ्याकाठी जमवू पंगत.
वडाच्या मग पारंब्यांना झोके आपण घेऊ,
चला गड्यांनो आपण सारे सहलीला जाऊ.
