बासरी
बासरी
1 min
266
बनते वेळूपासून
वाद्य बासरी
सात छिद्र
त्यावर गोजिरी
वाजवतात तोंडाने
मारून फुंकर
निघती त्यातून
मधुर स्वर
जमती नदीतीरी
कृष्णाचे सवंगडी
बासरीचा नाद
लावी गोडी
वाजता बासरी
हाती श्रीकृष्णाच्या
गोपिका देहभान
विसरून जायच्या
ऐकता कान्हाची
मधुर बासरी
प्रेमवेडी राधा
होई बावरी
बासरीची किमया
काय वर्णावी
गुरेढोरेही ऐकण्यात
रममाण व्हावी
