ताई गुणाची
ताई गुणाची
1 min
219
ताई माझी छबुकली
वाचनात रंगलेली
हौस खूप वाचनाची
तंद्रीमधे रमलेली (१)
झाली जरी संध्याकाळ
वाचायचा खूप नाद
खूप मोठी तू होशील
सारे घालतील साद (२)
मन एकाग्र करुन
सारे काढं ग वाचून
माझी तायडी हुशार
पुढे नंबर काढून (३)
आस नाहीच टिव्हीची
नाही आवड खेळाची
नको हिला भातुकली
सदा ओढ वाचनाची (४)
पुढे पुढे जात रहा
कीर्ती तुजला मिळेल
खूप खूप वाच राणी
मान सन्मान लाभेल (५)
