मायेची सावली
मायेची सावली
1 min
233
आईला कुणी म्हणे माय
तर कुणी म्हणे माऊली
माया ममता प्रेमाची मूर्ती
आई तर मायेची सावली
झाडं फुल देते फळ देते
उन्हात देते सर्वाना सावली
आई देखील एक झाडंच
सर्वाना घेते ती पदराखाली
पोटाला चिमटा देऊन वाढविते
आपले दुःख कळू नाही देत
लेकरांना सुखी ठेवण्यासाठी
रात्रंदिवस राही कष्ट करीत
