जय श्रीकृष्ण
जय श्रीकृष्ण
1 min
170
यशोदेचा लाडका
नंदलालचा हा पुत्र
श्रीकृष्ण त्याचे नाव
गोप-गोपिकांचा मित्र
सावळा त्याचा रंग
मोरपीस डोक्यावर
गायी-गुरे सभोवती
बासरी बसे ओठावर
बालपणी होता नटखट
चोरून खात होता लोणी
त्याने केले अनेक कारनामे
अजून येतात त्या आठवणी
महाभारताच्या युद्धात
अर्जुनाचा सारथी बनला
गीताचा उपदेश देऊन
सर्वा जीवनाचा सार दिला
जन्माष्टमीच्या दिवशी
आम्ही करतो त्याचे पूजन
सर्व माणसं एकत्र येऊन
रात्रभर चाले जागरण भजन
