STORYMIRROR

Somesh Kulkarni

Tragedy Inspirational

4  

Somesh Kulkarni

Tragedy Inspirational

बालकामगार

बालकामगार

1 min
380

माझं वय आहे सांगतात खूप लहान, मी बसत नाही कामगारांच्या यादीत;

'कामाला वय नसतं' म्हणत होता आमचा मालक कायम असतो खादीत


घरात आहे आई असते सतत आजारी,

मी करतो देवाला प्रार्थना तिला लवकर कर बरी


माझ्या लहान बहिणीला मला खूप शिकवायचंय,

फोटोत दिसणाऱ्या माझ्या बाबांसारखं मोठं व्हायचंय


आतापासूनच करतो मी इथं लपूनछपून काम,

माझे मित्र म्हणतात 'चल खेळायला, कशाला गाळतोस इथं घाम?'


एकदा पोलिस आले होते झडतीला मालकाने मला लपवलं,

मी दिसू नये म्हणून मला तळघरात झोपवलं


मलाही आहेत भावना वाटतं खेळावं आणि शिकावं,

मोठा होत जाताना माझं बालपणही टिकावं


करीन सगळंं हळूहळू जेव्हा सगळं होईल स्थिरस्थावर,

तोपर्यंत तरी भावनांना माझ्या मला घालावा लागणार आवर


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy