बाहुली
बाहुली
बाहुली माझी
छान छान छान
रंग तिचा आहे
गोरा गोरा पान...!!
डोळे बघा तिचे
निळे निळे निळे
केस तिचे बघा
काळे काळे काळे...!!.
गाल तिचे कसे
आहेत गुबरे गुबरे
बाहुली माझी दादा
सांग कुठं ठेवली बरे...!!
फ्रॉक तिचा आहे
कसा लाल लाल लाल
तिच्यासोबत खेळायला
दादा चाल चाल चाल...!!
बाहुली माझी छान
नकटे नाक फुगविते
कुरळे केस उडविते
बाहुली माझी आवडते...!!
