STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy Action

2  

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy Action

बाबा परतून येशील का

बाबा परतून येशील का

1 min
50

मलाही हक्क घटनेने दिले मिळवून बाबा तू

मलाही दार शाळेचे दिले उघडून बाबा तू

उभा बाहेर शाळेच्या कसा अभ्यास केला तू

घरी आलास पदव्यांना किती घेऊन बाबा तू

मला जातीत छळतो जो कसा मानव म्हणू त्याला

धडा माणूसकीचा मग दिला शिकवून बाबा तू 

कसा तो देवही बाटे मला पाहून दगडांचा

मला मंदिर देवांचे दिले खोलून बाबा तू

कुणाचा माठही बाटे कसा हलक्याच स्पर्शाने

दिला सागर समाजाला खुला करवून बाबा तू


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy