STORYMIRROR

Mrs. Mangla Borkar

Tragedy

3  

Mrs. Mangla Borkar

Tragedy

चित्रपटाची कविता

चित्रपटाची कविता

1 min
132

पायऱ्या उतरता उतरता 

हलकेच ठेच लागते 

आणि आठवणींच्या गाभाऱ्याला

उमाळा येतो


गर्द झाडीतल्या आठवणी 

फिरत फिरत पुन्हा  

एका क्षणी एकवटतात 

जेव्हा भानावर येत मन 

तेव्हा पायऱ्या उतरून झालेल्या असतात


त्या जगातलं मन 

या जगात स्थिरावत  

एक बिंदू चमकतो

आणि आठवणीतला मोहर पुन्हा बहरतो


पायऱ्या उतरताना  

उतरणीच नैराश्य नसत 

कारण , कारण  

दक्षिणायनात रमलेल्या मनाला 

कळतच नाही कधी उत्तरायण सामावत


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy