बाबा - मुलीचं पहिलं प्रेम
बाबा - मुलीचं पहिलं प्रेम
जन्म दिला आईने पण पहिली मिठी मारलीस तू ,
"माझं सौभाग्य जन्मलंय" असं बोललास तू ,
आईहून जास्त तुझीच मला ओढ रे ,
बाबा तुझ्याबद्दल काय बोलू रे....(१)
वडिलांचं छप्पर हरवल्यावर खंबीरपणे उभा राहिलास तू ,
धाकटयाना सांभाळण्यासाठी स्वतःची स्वप्ने विसरलास तू ,
थोरलं असण्याची कर्तव्ये तू चोख पार पाडलीस रे,
बाबा तुझ्याबद्दल काय बोलू रे...(२)
रागावते कधी आई तर तिलाच ओरडतोस तू ,
काही म्हणायचं नाही माझ्या मुलीला असा दम देतोस तू ,
माझ्या आधी तूच का डोळ्यातून पाणी काढतोस रे ,
बाबा तुझ्याबद्दल काय बोलू रे...(३)
दादापेक्षा जास्त जीव मलाच लावतोस,
माझ्या भविष्यासाठी किती खस्ता खातोस,
माझ्या भविष्यासाठी किती तुझी धडपड रे,
बाबा तुझ्याबद्दल काय बोलू रे....(४)
मुलगी सौभाग्य असते हे पटवून दिलंस तू ,
काही मागण्या आधीच सर्व काही समोर हजर केलंस तू ,
स्वतःआधी नेहमी माझाच विचार कसकाय करतोस रे,
बाबा तुझ्याबद्दल काय बोलू रे....(५)
देवाकडे मागणं एवढंच सदैव सुखी व समाधानी राहावंसं तू ,
माझी प्रेरणा, आदर्श आणि सामर्थ्य तू ,
तू केलेल्या असंख्य त्यागांची तुलनाच नाही रे ,
बाबा तुझ्याबद्दल काय बोलू रे....
बाबा तुझ्याबद्दल काय बोलू रे....(६)
#lovelanguage
समाप्त
