STORYMIRROR

Janhavi Ambulage

Others

3  

Janhavi Ambulage

Others

स्त्री- एक अभिमान

स्त्री- एक अभिमान

1 min
972

नऊ महिने सोसून त्रास

इवल्याशा जीवाला देते जन्म,

कधी सांगताच येणार नाही

किती थोर असतात स्त्रीचे कर्म..(१)


घेते जन्म ज्या घरात

तेथे आनंद घेऊन येते ,

आईवडीलांच नाव मोठं करून

मुलगी असल्याची सर्व कर्तव्ये पार पाडते..(२)


लहानग्या भावंडाना

आईसारखीच देते माया,

एक बहीण म्हणून

सदैव त्यांच्यावर ठेवते प्रेमाची छाया..(3)


होते ती सून अन बायको

राखून मायबापाच मन,

आपल्या संस्काराने आणि मायेने

फुलवते सासरचे नंदनवन...(४)


मुलगी, बहीण, बायको, आई

हसत हसत सर्व ती बनते,

तरीही का आजही जग मुलगी झाली की,

मुलगा व्हायला हवा होता म्हणून हळहळ व्यक्त करते ?

मुलगा व्हायला हवा होता म्हणून हळहळ व्यक्त करते ?..(५)



Rate this content
Log in