मैत्री
मैत्री
1 min
500
मैत्री म्हणजे काय असते,
सुकलेल्या वेलीला जीवनदान देणारी नवी पालवी असते...
निर्मळ नात्याचं आभाळ असते,
त्या आकाशात एकमेकांसोबत उडायचं, हसायचं, खेळायचं, भरपूर हुंदडायचं,
पण तुलना कधी एकमेकांत नसते..
मैत्री म्हणजे काय असते,
सुकलेल्या वेलीला जीवनदान देणारी नवी पालवी असते...
आनंद, सुख, आधार,
विश्वासाची व्याख्या असते,
मित्र-मैत्रिणींना एका माळेत ओवून ठेवणारा धागा असते...
मैत्री म्हणजे काय असते,
सुकलेल्या वेलीला जीवनदान देणारी नवी पालवी असते...