झगडावं तर लागेलच...
झगडावं तर लागेलच...
येतील असंख्य अडथळे वाटेत,
मार्ग तर शोधावा लागेलच..
स्वप्नं पूर्ण करण्यासाठी,
झगडावं तर लागेलच..!!
होईल साऱ्या दिशांनी विरोध,
नियंत्रणात हवा स्वतःचा क्रोध..
विरोधाचा सामना तर करावा लागेलच..
स्वप्नं पूर्ण करण्यासाठी,
झगडावं तर लागेलच..!!
पत्करायची नाही हार,
विसरायचे नाहीत उपकार..
हिंमतीने पाऊल पुढे टाकावं तर लागेलच...
स्वप्नं पूर्ण करण्यासाठी,
झगडावं तर लागेलच..!!
करावे लागू देत कितीही त्याग,
माय-बापाला सुख देण्याचं सौभाग्य मिळेलच..
स्वप्नं पूर्ण करण्यासाठी,
झगडावं तर लागेलच...!!
