अतिशहाणे
अतिशहाणे
शिक्षणाने शहाणे नाही
झाले अतिशहाणे,
आता वाटतंय खरंच
बरे होते अडाणे..
स्वार्थापलिकडे काय
कळतं या शाहाण्यांना,
समजू नका कधीही
छोटे अडान्यांना...
बापाला बाप न म्हणती
सांगा शिकले हे काय,
वृध्दाश्रमात असते
या शाहण्याची बाप माय..
शिकलेत सारेच
या जगाला लुटायला,
अजून वेळ आहे
माणसाला माणूस भेटायला.
अतिशहाणे
"पुष्पाग्रज "
शिकलो म्हणून शाहाणे
नसतात वेडे अडाणे,
संस्कार जपा रे
तळमळीचे सांगणे...
