अस्तित्व
अस्तित्व
खरेतर तोडूनी बंधने आयुष्याची आज ती मुक्त आहे,
"उपयोग" नाही आता हिचा' ऐकून रोज मरण जगत आहे....
थकला देह तिचा आज मृत्यूशी देतो आहे झुंज,
वेळ नाही कोणाला सगळे आपल्याचं विश्वात गुंग....
नऊ महिने वाढवून बाळाला सोसलं तिने पुष्कळ,
पण फुटक्या नशिबाने तिला दिले एकटेपणाचे फळ....
अशा अनेक वयस्क आया रोज अश्रूंत भिजत आहेत,
"उपयोग" नाही आता आपला म्हणून कण कण तुटत आहेत....
