STORYMIRROR

sayali kulkarni

Romance

2  

sayali kulkarni

Romance

शृंगार

शृंगार

1 min
205

आज असंच वाटलं सुंदर जरीकाठी पैठणी नेसावी,

नटावं मनमुराद अन छबी आपली आरशात न्याहाळावी....

जरा जास्त लाली लावून नाजूक ओठांवर,

लांबसडक केस सोडावेत मोकळे पाठीवर...

सोन्याचे झुबे अन नाजूक वेलही घालावेत आज जरा,

गळ्यात हलकासा मोत्याचा सरही शोभून दिसेल मला...

रोजचं कुंकू सोडून आज कपाळावर लावावी नाजूक टिकली,

हातात घालावं ब्रेसलेट शोभा त्याने माझी वाढवावी...

पायात घालावे घुंगरांचे पैंजण अन डोळ्यांत घालावं काळभोर काजळ,

त्याच्या मनात प्रेमाचा मग तरी येईल का उफाळून सागर...???


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance