STORYMIRROR

sayali kulkarni

Others

4  

sayali kulkarni

Others

पाऊस मनांमनातला...

पाऊस मनांमनातला...

1 min
346

तो पहिला थेंब पावसाचा धरणीला बिलगला,

सुगंध ओल्या मातीचा मग सगळीकडे दरवळला....


दाटलेल्या आभाळी कोवळी सूर्यकिरणे उमटली,

इंद्रधनुष्य आखीव पाहून सारी मने तृप्त झाली.....


धुके मखमली सारे हिरव्यागार डोंगरावर सजले,

चिंब पावसाने अवघ्या सृष्टीला सजवले, नटवले...


पाऊस घेऊन आला सोबत सुखाचे चांदणे,

तेजाळते आभाळ गायी नाविण्याचे गाणे...


Rate this content
Log in