STORYMIRROR

sayali kulkarni

Abstract

3  

sayali kulkarni

Abstract

जगण्याच्या उंबरठ्यावर

जगण्याच्या उंबरठ्यावर

1 min
162

बोलके शब्द बोलकी लेखणी,

पण मनात काहूर गुंतलेल्या भावनांचे,

जगण्याच्या उंबरठ्यावर.....


    भटकत राहतं मन कशाचीचं उणीव नाही,

    तरीही वाटते कठीण वाट आयुष्याची,

    जगण्याच्या उंबरठ्यावर.....


एका चेहऱ्यामागे मुखवटे हजार,

कोण आपला कोण परका समजत नाही,

जगण्याच्या उंबरठ्यावर......


     सरून गेली काळी रात्र सुरू झाला दिवस स्वच्छ,

     पण मन होतं कलुषित ते निर्मळ झालं नाही,

     जगण्याच्या उंबरठ्यावर......


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract