असतात फुलांनाही काटे
असतात फुलांनाही काटे
जीवनाचा प्रवास चालला होता
नव्हती फुले अन काटे तो सुखदायी होता
पुढे जाता भेटली फुले
पाहून ते मन माझे खुले
फुले तोडण्या हात पुढे जाता
मन दुःखी झाले काटे बोचता
दुःखदायी प्रवासाकडे मग मन वळले
फुलांना काटे असतात तेव्हा कळले
पुढे ही भेटली वाटेत फुले
पाहून मन पुन्हा खुलले
पण जाता जात नाही मनातून ते
की असतात फुलांनाही काटे
असतात फुलांनाही काटे

