अष्टाक्षरी
अष्टाक्षरी
रोज माझे पंगतीला
राहू देतं कुठे देणे
माणसाचे लिहू देत
फक्त एक नवे गाणे
उखाण्यात नाद खुळा
गाऊ देत सुस्वराने
खऱ्यासाठी आळवीतो
फक्त एक नवे गाणे
भेदाभेद सरू देतं
रंगू नवी तावदाने
अभंगात रंग गढे
फक्त एक नवे गाणे
लख्ख नवे पंख लावू
दूर उडू निर्धाराने
आकाशाला भिडू देतं
फक्त एक नवे गाणे