असं पण असतं का प्रेम
असं पण असतं का प्रेम
दिसला तिला तो तिच्या मैत्रीणाला अॅड
म्हणुनच मेसेज केला तिने त्याला
ओळखतोस कसा हिला तू रे
त्याने प्रेमाने लगेचच सांगितले तिला
ओळखत नाही मी तिला
इथूनच सुरूवात झाली यांच्या प्रेमाला||1||
रोजच बोलायचा तिला तो
मला तू आवडायला लागली तू
पहिलं प्रेम होऊ शकशील का माझं तू||2||
नाही नाही म्हणत तिने
स्वतःच त्याला प्रपोज केलं
मजेत मजेत होऊन ते प्रेम
आता सिरीयस मॅटर बनून गेलं||3||
झाले त्यांच्या प्रेमाला आज
आठ महिने तरीही भेटले नाही
ते अजूनही एकमेकांस||4||
मेसेजवरचं हे प्रेम
एवढं सिरीयस बनून गेलं
विचार करा भेटले असल्यावर
किती सुंदर ते झालं असतं||5||
म्हणत असायचा नेहमी तो
लग्न करुया आपण नक्कीच
पण या भांडणातून
मार्गच त्यांना सापडत नव्हता||7||
असंच दिवस जाता जाता
आला दुरावा त्यांच्या नात्यांत
राहा सुखी तुझ्या आयुष्यात
असं म्हणून सोडून गेली ती त्याला||8||
मनातल्या मनात बोलत होती ती
सोडून जातेय तुला मी
पण अजूनही प्रेम आहे माझ्या मनात
अजूनही प्रेम आहे माझ्या मनात||9||

