STORYMIRROR

काव्य चकोर

Abstract

2  

काव्य चकोर

Abstract

असे सारे शब्द

असे सारे शब्द

1 min
414

असे सारे शब्द 

येतात कोठून..

ना आग ना धूर

जातात पेटून..!!


कधी ते येतात

पाझर फुटून..

कधी ते जातात

सर्वस्व लुटून..!!


त्वेषे मांडतात

म्हणणे रेटून..

विचार मवाळ

शेरास भेटून..!!


जसे बसतात

मनात खेटून..

तसेच देतात 

खाईत लोटून..!!


मोदे बरसती

आकाश गाठून..

खिन्न राहतात

तळास साठून..!!


रौद्रे जन्मतात

पाथर फोडून..

लाचार अंतात

हातास जोडून..!!


असे सारे शब्द 

येतात कोठून..

ना आग ना धूर

जातात पेटून..!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract