अपराजित
अपराजित
फुल गोजिरे
नित्य अपराजिता
जपे अस्मिता
कन्या सुरेख
गोकर्णी रेखाटली
पुष्पे नटली
अपराजिता
धेय्य वेडी दिसते
निल वर्णिते
डोळ्यात तेज
चेहऱ्यात चमक
ध्यासी धमक
परीधानीत
दुहेरी नील झगा
हरीत रांगा
सुकुमारीका
वेलीवरती झुले
हास्य ते खुले
