अपंग
अपंग
आज म्या पाहिला एक अपंग
बाहू तयाचे होते मंद
मंद होती स्मृती तयाची
अन पायांचे सुटलेले बंध
साह्य तयांचे घेऊनीया तो
फिरवीत होता एक कुंचला
को-या - गो-या कगदावरती
ऊमटे सुंदर चित्रकला
अपंगपणाचे तयास नव्हते भान
ती चित्रकला ही होती छान
आश्र्चर्याने पुससी प्रश्न तया
बोले ह्या अपंगत्वाचा मज अभिमान
तव मन हे संगे माझे मला
आपल्या परि हा अपंग बरा
हात - पाय धड आपले असता
सदा कोसशी तू नशिबाला
ऊरी मग एकच विश्र्वास दाटे
ह्या अपंग मनाला देऊन फाटे
असे नशिब आपण बनवावे
जया समोर हे नभ ही थिटे
