अपेक्षा उत्तराची
अपेक्षा उत्तराची
तिच्याही मनाचं आभाळ
नुसतंच यायचं भरुन
कोसळायचं मात्र नाही.
ओंजळ पसरुन मीही
केव्हाचा असायचा उभा
ओंजळ रितीच राही...
मेघदूत कुणी म्हटले ढगांना
यात मला पडायचं नाही
मन उत्तराची वाट पाही....
नभी ढगांची व्हायची गर्दी
सुखसरींचा मीही दर्दी
सय तिची चुकायची नाही...
अपेक्षा होती उत्तराची
समजूत घालून स्वतःची
मग पुन्हा व्हायचो..प्रवाही.

