STORYMIRROR

Vikram Gaikwad

Inspirational

3  

Vikram Gaikwad

Inspirational

अंतर

अंतर

1 min
928


मी अंतर फारसे मोजत नाही

नाशिबाचेही गणितही पुन्हा-पुन्हा मांडत नाही

उरली सुरली भिस्तही

कुणावर लादत नाही

एक खर सांगू का ... आता नातवांचे हसू पाहताना

मला माझेच अश्रू दिसत नाही

मी विटलो असेल कधीतरी संकटाना

पण म्हणून मी काही जगण काही सोडल नाही

कधी मनभरून हसलो असेल

कधी हिच्या संगे चिंब पावसात भिजलो असेल

आता आयुष्याचा समुद्र भरला खरा

पण त्याचा खोलपणा जाणवतच नाही

आता गवसणीचे वैगेरे नाही पडत स्वप्न

पडतात ते केवळ प्रश्नच

पण मी लढेन

काळाने जरूर मला जरूर वृध्द केल असेल

परंतु माझ्या आरशात

मी आहे तसाच तरुण अजून

आणि राहीलही कायमचा.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational