स्वप्न आमचे....
स्वप्न आमचे....
1 min
1.4K
स्वप्न थोडे आमचे लहान आहे
चिखलाने भरलेल्या हातांवर
अजूनही आमचा जीव आहे
कारण आम्ही अजून थोडे लहान आहे..
जागा थोडी आहे खेळायला आम्हाला
पण तिथे मजा मात्र फार आहे
अजूनही नाक तसेच गच्च आहे
कारण अजून आम्ही थोडे लहान आहे
भरले पाय ,छोटी म्हणाली 'आता मार खाय'
आजी म्हणाली 'आई येणाच्या आत
आधी नळावर जाय'
असेच सगळं डोळ्यात अजून आमच्या साचून आहे
कारण अजून आम्ही लहान आहे
कधी केले खाऊचे वाटे ,कधी काढले पायातले काटे
भांडलो फार ,केला कहर म्हणून काय झालं
प्रेम थोडंच कुणाकडे उधार थोडीच आहे..
कारण अजून आम्ही लहान आहे
होऊ मोठे उगाच येतील ओठांवर केस
म्हणून काय माती सोडायची असते
तिच्याकडून घेतलंल परत करायचं आहे
कारण अजून आम्ही लहान आहे
