STORYMIRROR

विजय वैशाली दत्ताराम पराडकर

Romance Tragedy Fantasy

3  

विजय वैशाली दत्ताराम पराडकर

Romance Tragedy Fantasy

अंत जवळी आला ...

अंत जवळी आला ...

1 min
357

माझा देह माझ्याच शरीराला कंटाळलाय

तू तरी मला सोड, नाहीतर मी तुला त्यागतो

            असं मला म्हणालाय...!!


का? असं का म्हणतोयस विचारलं त्याला

म्हणे जेवाचे हाल तुझ्या पाहवत नाही मला

त्यांनी परोपकाराची भाषा केली तेव्हाच संपलास तू,

अजूनही निजीवतेला का आला घालतोस तू ?...


आकांताने माझंच जीव माझ्याशी बोलतोय

त्यालाही कळतंय मी माझे भोग-भोगतोय

आत्मा निष्ठुर झालाय, मन साथ देतंय,

देहातून शरीर ठिणगी-ठिणगी खाक होतंय...


माझा देह माझ्याच शरीराला कंटाळलाय

तू तरी मला सोड, नाहीतर मी तुला त्यागतो,

            असं मला म्हणालाय ...!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance