अनमोल
अनमोल
अनमोल क्षण ते आपले
तुझ्या माझ्या प्रत्येक भेटीचे
वर्गात येताच तुझे मला शोधणे
तुझे बघणे पात्र मला लाजेचे
आठवते तुझे ते सायकलने
चॉकलेट मला घेऊन जाणे
माझ्या पाय वाटेवर कधी
फुले तुझे ठेवून जाणे
आठवतो मला तो क्षण
सरांचे तु मार खाल्ले
मला सारखे बघता बघता
गणित सारे विसरून गेले
छडीचे ते मार सख्या
हातावर तुझ्या बसत होते
विश्वास कर प्रिया माझे
हृदय सारखे तुटत होते
त्या आठवणीने माझे
डोळे ओले आजही होते
प्रेम तुझ्यावर होते तरी
जीवनात तुझे येणे नव्हते

